April 2019 Holiday List: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती' ते 'ईस्टर' मुळे 14-21 एप्रिल दरम्यान सलग सुट्ट्यांची चंगळ
April Mid Week Holiday List 2019 (Photo Credits: Pixabay)

April 2019 Mid Month Long Weekend: मुलांच्या शाळेच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांसोबत (Summer Vacation) आता एप्रिल महिन्याच्या मध्यात सलग सुट्ट्या आल्या आहेत. त्याच्या जोडीनेच लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha Election Polls) मतदान असल्याने सुट्ट्यांची चंगळ आहे. पहा एप्रिल महिन्यात 14 ते 21 एप्रिल 2019 च्या आठवड्यात येणारे महत्त्वाचे सण, सुट्ट्या कोणत्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल)

समाजसुधारक आणि भारतीय संविधान, राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन 14 एप्रिल 2019 दिवशी आहे. यादिवशी बौद्ध धर्मीय बाबासाहेबांना आदरांजली वाहतात.  रविवार असल्याने या दिवशी सुट्टी आहे. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2019: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही गोष्टी)

महावीर जयंती (17 एप्रिल)

जैन धर्मीयांचे शेवटचे तीर्थकार महावीर यांच्या जन्म दिवसानिमित्त चैत्र शुद्ध त्रयोदशी दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते.  ही सार्वजनिक सुट्टी असल्याने कार्यालयं बंद राहणार आहेत.

हनुमान जयंती (19 एप्रिल)

चैत्र पौर्णिमेदिवशी सूर्योदयाच्या मुहूर्तावर 'हनुमान जयंती' साजरी केली जाते. याच दिवशी गुड फ्रायडे देखिल असल्याने  सुट्टी आहे.

गुड फ्रायडे (19 एप्रिल)

ख्रिस्ती धर्मीयांच्या मते या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले होते. त्याची आठवण म्हणून हा त्यांच्यासाठी शोकदिन असतो. ख्रिस्ती बांधव या दिवशी चर्चमध्ये जाऊन येशूच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करतात.  ही सार्वजनिक सुट्टी असल्याने कार्यालयं बंद राहणार आहेत.

शब-ए-बरात (20 एप्रिल)

'शब' म्हणजे रात्र आणि 'बरात' एक अरबी नाव आहे ज्याचा अर्थ निरपराधीपणा असा होतो.वर्षातून एकदा येणार्‍या या रात्री अल्लाह कडे मुस्लीम बांधव त्यांच्याकडून झालेल्या चूकांची माफी मागतात.

ईस्टर संडे ( 21 एप्रिल)

गुड फ्रायडे दिवशी क्रॉसवर मृत्यूमुखी झालेले येशू ख्रिस्त तीन दिवसांनी पुन्हा जिवंत झाले. ईस्टरचा आठवडा हा पवित्र आठवडा म्हणून साजरा केला जातो.  रविवार असल्याने या दिवशी सुट्टी आहे.

एप्रिल -मे 2019 ड्राय डे

सण आणि प्रमुख दिवसांच्या धामधूमीसोबतच या आठवड्यात लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदानाचा दुसरा टप्पा 18 एप्रिल दिवशी आहे. महराष्ट्राच्या 10 मतदारसंघांमध्ये या दिवशी मतदान होईल. मतदानादिवशी सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सलग चार दिवसांचा मोठा विकेंड ब्रेक घेऊन तुम्ही छोटी ट्रीप आयोजित करू शकता.