Kolhapur: दोनशेच्या नोटांपासून बनवल्या 2 हजारांच्या बनावट नोटा, सिरीअल नंबरमुळे फुटले बिंग; दोघांना अटक
Notes (Photo Credit: Wikimedia Commons and Pixabay)

नोटबंदीनंतर चलनात आलेल्या दोनशे (Two Hundred Notes) आणि पाचशेच्या (Five Hundred Notes) बनावट नोटा वितरीत करणाऱ्या अनेक रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तसेच दोनशे आणि पाचशेच्या नोटा स्वीकारताना तपासून पाहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. याचपार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये (Kolhapur) दोनशेच्या नोटांपासून चक्क 2 हजारांची हुबेहूब नोटा बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परंतु, या सर्व नोटांचे सिरीअल नंबर एकच असल्यामुळे आरोपींचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या एका मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम पवार असे मुख्य आरोपीचे नाव आहे. उत्तम हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी येथील रहिवाशी आहे. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु, उत्तम हा गेल्या काही महिन्यांपासून दोनशेच्या नोटांपासून दोन हजारांची नोट बनवण्यासाठी सर्च चॅनेलवरून प्रशिक्षण घेत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर तो यशस्वी झाला. त्याने 2 हजारांच्या 17 बनावट नोटा तयार केल्या. उत्तमचा मित्र अनिकेत याच्या विडिलांच जेसीबीचा व्यवसाय होता. त्यामुळे ते नेहमी बँकेत मोठ्या रकमेचा भरणा करतात ही बाब उत्तमला माहित होती. यामुळे उत्तमने अनिकेकडे या नोटा बॅंकेत भरण्यासाठी दिल्या. अनिकेतने 1 लाख रुपयांच्या खऱ्या आणि 34 हजार रुपयांच्या खोट्या नोटा राष्ट्रीयकृत बँकेत जमा केल्या. मात्र, या नोटांचा सिरिअल नंबर एकच असल्याने त्यांचे बिंग फुटले. हे देखील वाचा- Kolhapur Road Accident: कोल्हापूरच्या मसाई पठारावरून कार दरीत कोसळली; 2 जागीच ठार, एक जण गंभीर जखमी

याप्रकरणी बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.