कोल्हापूरच्या (Kolhapur) मसाई पठारावरून (Masai Pathar) कार खोल दरीत कोसळल्याची (Car Falls Into Valley) धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (6 ऑगस्ट) दुपारी घडली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समजत आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित लोक फिरण्यासाठी मसाई पठारावर आले होते. मात्र, घाटात अंदाज चुकल्यामुळे कार खोल दरीत कोसळली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लोक इचलकरंजी येथील रहिवाशी असून ते फिरण्यासाठी मसाई पठारावर आले होते. परंतु, घाटात अंदाज चुकल्यामुळे त्यांची कार खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक मदतीला धावून गेले. तसेच या घटनेबाबत पोलिसांना कळवले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही अपघात इतका भीषण होता की, दरीत कोसळलेल्या कारचा चक्काचूर झाला आहे. हे देखील वाचा- मंगळसुत्र गहाण ठेवून दिली पतीच्या खूनाची सुपारी; भिवंडी येथील धक्कादायक घटना
याशिवाय, मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटातही आज भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या माल वाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.