प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: ANI)

कोल्हापूरातील (Kolhapur) माजी उपमहापौर यांच्या पतीच्या मटका अड्ड्यावर आयपीएस (IPS) पोलिसांच्या पथकाने धाड टाकली. परंतु पोलिसांवरच बंदुक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. तर पोलिसांनी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका शमा मुल्ला यांच्यासोबत अन्य 13 जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या पथकाने सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा मारला. त्यावेळी हा मटका अड्डा शमा मुल्ला यांचे पती सलीम मुल्ला असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी मुल्ला यांच्या घरी या प्रकरणाची तपासणी करण्यास गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.(हेही वाचा-धक्कादायक! परीक्षेत कॉपी करू न दिल्याने प्राध्यापकांना बेदम मारहाण; 7 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल)

परंतु सलीम मुल्ला आणि हल्लेखोरांनी घटनास्थळापासून पळ काढला असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच शमा मु्ल्ला यांनासुद्धा ताब्यात घेतले आहे.