Representational Image | (Photo Credits: PTI)

Kohinoor Electronics Director Vishal Mewani Death: कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्सच्या संचालकांचा लिफ्टच्या शॉफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही घटना रविवारी संध्याकाळची असल्याची माहिती दिली आहे. विशाल मेवाणी असे त्यांचे नाव असून ते आपल्या मित्राला भेटण्यासाठी वरळीतील दुमजली इमारत 'ब्यूना विस्ता' येथे गेले होते.(Fire In Pune: पुणे कॅन्टोन्मेंट मधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचा आयसीयू प्रभाग आग)

मेवाणी हे दुसऱ्या मजल्यावर पोहचण्यासाठी ते लिफ्टमध्ये गेले असता त्यांना ते शॉफ्ट मध्ये असल्याचे वाटले. परंतु त्यावेळी मेवाणी यांनी त्यामधून बाहेर निघण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न अयशस्वी ठरले आणि वरुन आलेल्या लिफ्टच्या खाली दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.अधिकाऱ्यांनी या प्रकरणी अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाबद्दल कळले असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहचल्यावर मेवाणी यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ब्रीच कॅन्डी येथील रुग्णालयात सुद्धा घेऊन जाण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणाचा अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आल्याचे वरळी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ निरिक्षक सुखलाल वार्पे यांनी म्हटले आहे.(जळगाव: रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलावर आईला हातगाडीवरुन रुग्णालयात नेण्याची वेळ)

तर 46 वर्षीय मेवाणी यांच्या मित्राने पोलिसांना असे सांगितले की, ते आपली मुलगी रेशमा हिच्यासोबत वरळीतील त्यांच्या घरी आले होते. मेवाणी यांना दातासंदर्भातील समस्या उद्भवली होती. याच कारणामुळे आपल्या मित्राकडे येत एखादा उत्तम डॉक्टर सुचवावा असे विचारण्यास आले होते. पण ज्या वेळी मेवाणी इमारतीत आले त्यावेळीच ही दुर्घटना घडून त्यांचा मृत्यू झाला. मात्र मेवाणी यांची मुलगी सुदैवाने बचावली आहे.