
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून सुद्धा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर जळगाव येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानुसार महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मिळालीच नाही. त्यामुळे महिलेला चक्क हातगाडीवरुन रुग्णालयात दाखल करण्याची वेळ अल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.
भुसावळ येथे महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने तिला मुलासह नातेवाईकांनी हातगाडीवरुन घेऊन जाण्यात आले. ऐवढेच नाही तर एका रुग्णालयात नेले असता त्यांनी आमच्याकडे उपचारासाठी पुरेशी सोयसुविधा नसल्याने दुसरीकडे घेऊन जा असे सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. तसेच या प्रकरणी नातेवाईकांनी संताप सुद्धा व्यक्त केला आहे.(Coronavirus in Pune: पुण्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा 1 लाखांच्या पार- महापौर मुरलीधर मोहोळ)