Kirit Somaiya Vs Anil Parab: अनिल परब कथित रिसोर्ट प्रकरणी चलो दापोलीची हाक देत भाजप नेते किरिट सोमय्या दापोलीत दाखल

चौकशीसाठी पुढला नंबर आता अनिल परब (Anil Parab) यांचा लागणार का, या चर्चांना उधाण आलं आहे. दापोली रिसोर्ट प्रकरणी (Dapoli Resort Case) अनिल परब यांची चौकशी सुरु आहेच. पण आज चलो दापोलीची (Chalo Dapoli) हाक देत दापोलीत दाखल झाले आहेत. सोमय्यांची (Kirit Somaiya) आक्रमकता बघता लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर (Anil Parab Resort Scam) तोडक कारवाई प्रशासनाने करावी यासाठी सोमय्या आज दापोलीत (Dapoli) दाखल झाले आहेत. सीआरझेडचे (CRZ) उल्लंघन करून रिसॉर्टचे बांधकामासह (Resort Construction) रिसॉर्ट खरेदी प्रकरणात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तरी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी खुद्द किरिट सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत.

 

दापोलीतील साई रिसॉर्ट (Sai Resort Dapoli) प्रकरणी सोमय्यांनी जिल्हाधिकारी प्रशासनासह केंद्रीय पर्यावरण मंत्रालय (Central Environment Ministry) आणि ईडीकडे (ED) तक्रार केलेली आहे. तसेच आजच्या दापोली (Dapoli) दौऱ्यात किरिट सोमय्या मुरुड ग्रामपंचायतीच्या (Murud Gram Panchayat) हद्दीतील साई रिसॉर्टला सोमय्या भेट देणार आहेत. या साई रिसोर्ट कथीत प्रकरणीच शिवसेना आमदार आणि उध्दव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय अनिल परब (Anil Parab) यांच्यावर टांगती तलवार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता लवकरच परबांविरोधात मोठी कारवाई कारवाई असं भाकीत किरिट सोमय्या यांनी केलं आहे. (हे ही वाचा:- Uddhav Thackeray Vs CM Eknath Shinde: दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच)

 

गेल्या काही दिवसांपूर्वीचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणी ईडी (ED) कडून अटक करण्यात आली आहे. संजय राऊतांना अटक करण्यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्राचाळ घोटाळ्याबाबत असंच भाकीत केलं होत. यापूर्वीही परिवहन मंत्री अनिल परब यांना दापोली रिसाॅर्टप्रकरणी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. तसेच सबंधीत प्रकरणी त्यांना ईडीकडून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. तरी अनिल परब कथित घोटाळ्या प्रकरणी पुढे काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.