गेल्या काही दिवसांपूर्वीचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणी ईडी (ED) कडून अटक करण्यात आली आहे. संजय राऊतांना अटक करण्यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्राचाळ घोटाळ्याबाबत ट्वीट (Tweet) करत राऊतांवर निशाणा साधला होता. तरी आज सकाळीचं किरीट सोमय्या यांनी एक सुचक ट्वीट केल असुन आता ईडी चौकशीसाठी पुढला नंबर अनिल परब (Anil Parab) यांचा लागणार का, या चर्चांना उधाण आलं आहे. दापोली रिसोर्ट प्रकरणी (Dapoli Resort Case) अनिल परब यांची चौकशी सुरु आहेच. पण सोमय्यांचं ट्वीट (Kirit Somaiya Tweet) बघता लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट (Tweet) केलं आहे, अनिल परब यांच्या दापोली रिसोर्ट प्रकरणी पर्यावरण मंत्रालयाकडे (Ministry Of environment) पाठपुरावा करत आहोत, दोन ते चार दिवसांत मंत्रालयाकडून रिसॉर्ट पाडण्याचा अंतिम आदेशाची अपेक्षा असल्याचं ट्वीट आज भल्या सकाळी किरिट सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्यांचं हे ट्वीच बघता अनिल परबांवर लवकरच मोठी कारवाई होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी उद्यापासून राज्यात पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) सुरुवात होत आहे. म्हणजे पुढील काही दिवसात राज्यात काय मोठ्या घडामोडी घडतात हे बघण महत्वाचं ठरणार आहे. (हे ही वाचा:-Maharashtra Monsoon Session: राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात तर आज नवनिर्वाचित मंत्रीमंडळाची बैठक)
#AnilParab Resort issue.
Pursuing with Environment Ministry...
Expecting FINAL Order of Demolition in couple of days
अनिल परब रिसॉर्ट...
पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहोत...
दोन चार दिवसांत रिसॉर्ट पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित आहे @Dev_Fadnavis @mieknathshinde
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 16, 2022
यापूर्वीही परिवहन मंत्री अनिल परब यांना दापोली रिसाॅर्टप्रकरणी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. तसेच सबंधीत प्रकरणी त्यांना ईडीकडून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. तरी पर्यावरण मंत्रालय दापोली रिसाॅर्ट प्रकरणी काय भुमिका घेतात हे बघण महत्वाच ठरणार आहे.नुकत्याच झालेल्या खातेवाटपात पर्यावरण व वातावरणीय बदल हे खातं खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्वतकडे ठेवून घेतल आहे.