Maharashtra Monsoon Session: राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात तर आज नवनिर्वाचित मंत्रीमंडळाची बैठक
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ (Photo Credits: Youtube)

महाराष्ट्रात (Maharashtra) उद्यापासून म्हणजे 17 ऑगस्ट (August) पासून पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) सुरुवात होणार आहे. राज्यात सत्तस्थापना,गटबाजी या राजकीय नाट्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक पहिल्यांदाचं आमनेसामने येणार आहेत. म्हणून यावेळचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गेल्या अनेक दिवसात विरोधकांकडून मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet Expansion), खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर कडाडून टीका होताना दिसली. पण आता मंत्रीमंडळ स्थापनेसह खातेवाटप नंतर नवनिर्वाचित सरकारचं हे पहिलं वहिल्या अधिवेशनातून राज्याच्या जनतेला काय मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तरी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला म्हणजे आज शिंदे फडणवीस सरकार मधील नवनिर्वाचित मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडणार आहे.

 

आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Atithigruh) चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रच्या  पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची संयुक्त पत्रकार परिषद (Press Confernce) होणार आहे. यावेळी विरोधी पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित असतील. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडाळाच्या बेठकी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) देखील पत्रकार परिषद घेणार आहेत.(हे ही वाचा:- Vinayak Mete Funeral: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे अनंतात विलीन, अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित)

 

यावेळी पावसाळी अधिवेशन 6 दिवसांचं म्हणजे 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दरम्यान पार पडणार आहे. गेल्या वर्षी महाविकास आघाडी अधिवेशन केवळ 2 दिवसात आटोपण्यात आलं होतं. तरी यावेळी राज्यातील संपूर्ण जनतेचं होणाऱ्या या अधिवेशनाकडे लक्ष लागलेलं आहे. 17 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली.तसेच 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.