किरीट सोमय्या । Twitter/ANI

मुंबई मध्ये काल राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक यांचा दिवसभर हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा झाल्यानंतर रात्री नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटण्यासाठी गेलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवरही शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा भाजपाचा आरोप आहे. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर दगडफेकीत सोमय्यांच्या गाडीची काच फुटली असून त्यांच्याही हनुवटीला जखम झाली आहे. यावर पोलिसांकडूनही बोगस एफआयआर नोंदवली गेल्याचा आरोप करत माझा मनसुख (Mansukh Hiren) करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray)  डाव असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

आज मीडीयाशी बोलताना किरीट सोमय्यांनी आपण झालेला प्रकार होम सेक्रेटरीला कळवला आहे. त्यांच्याकडे या हल्ल्याचा अहवाल दिला जाणार आहे. एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. असं सांगितले आहे. आमचा आवाज दाबला जात आहे. अ‍ॅन्टिलिया केस मध्ये मनसुख हिरेनला मारल्याप्रमाणे मला देखील मारण्याचा प्रयत्न केला जात आहेत. हा तिसर्‍यांदा शिवसैनिकांकडून प्राणघातक हल्ला झाल्याचा किरिट सोमय्यांचा आरोप आहे. नक्की वाचा:  Kirit Somaiya Allegations: पोलिसांनी चुकीच्या कलमांसह एफआयआर दाखल केला, किरीट सोमय्यांचा आरोप.

खार पोलिस स्थानकातून बाहेर पडताना किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यानंतर वांद्रे पोलिस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी गुन्हा नोंदवला आहे.

DCP Manjunath Shinge यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या निपक्षपातीपणे तपास सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपाकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. झेड दर्जाची सुरक्षा असताना किरीट सोमय्यांवर असा हल्ला होणं दुर्भाग्यपूर्ण असून राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असल्याचं भाजपा नेत्यांचं मत आहे.