गर्लफ्रेंडला त्रास दिला म्हणून आपल्याच मित्राच्याच गळ्यावर सपासप वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील भोसरी (Bhosari) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केले असून स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीच्या मानलेल्या बहिणीसोबत त्याच्या मित्राचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांचे वारंवार भांडण होत असल्याचा राग आरोपीला होता. याच रागातून आरोपीने संबंधित व्यक्तीच्या गळ्यावर वार केल्याची माहिती समोर आली आहे.
अभिषेक मधुकर कांबळे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, किरण शिवाजी थोरात असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक हा किरणचा मित्र आहे. अभिषेकची प्रेयसी ही आरोपीची मानलेली बहीण आहे. मानलेल्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती किरणला लागली होती. त्यातच अभिषेक आणि त्याच्या प्रेयसी यांच्यात सतत किरकोळ कारणावरुन भांडण होत होती. याचा किरणला राग होता. याच रागातून किरणने कट्टरने अभिषेकच्या गळ्यावार वार केले आहे. यासंर्भात न्युज 18 लोकमतने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Pune Schools Reopens: पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 वी ते 12 वी चे वर्ग 4 जानेवारी पासून पुन्हा सुरु होणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक याच्यावर वार केल्यानंतर आरोपी किरण तेथून पसार झाला. अभिषेक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता. काही वेळाने त्याला रिक्षाने जवळील रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.