
Temperature in Maharashtra Cities: महाराष्ट्रासह देशामध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. उन्हाचा तडाखा वाढत आहे. बुधवार (25 मे)च्या तापमानानुसार जगात मध्यप्रदेशातील खारगोन (Khargone) आणि महाराष्ट्रातील अकोला (Akola) या शहरांमध्ये तापमान 45 अंशाहून अधिक उष्ण होते. खारगोनमध्ये 45.6 अंश तर अकोलामध्ये 45.1 अंश इतके तापमान होते. राज्यात तापमानाचा पारा वाढणार, विदर्भात उष्णतेची लाट तर मुंबईतील तापमान 35 अंशावर जाण्याची शक्यता
विदर्भात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्यानंतर सध्या उष्णतेची लाट आहे. यामध्ये पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहणार असले तरीही वातावरणात आर्द्रता कायम असेल. उन्हाचा पारा कडक असल्याने दुपारच्या वेळेस कडक उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसात वातावरणामध्ये वाढ होऊन हे तापमान 48अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स
आजचं महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील वातावरण
Accuweather च्या संकेतस्थळावर नोंदवलेल्या आजच्या तापमानानुसार,
मुंबई 34 अंश
पुणे 40 अंश
नाशिक 40 अंश
नागपूर 44 अंश
अकोला 44 अंश
धुळे 42 अंश
अमरावती 44 अंश
जळगाव 45 अंश
रत्नागिरी 34 अंश
औरंगाबाद 41 अंश
जगातील सर्वाधिक उष्णतेच्या शहरांमध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीचा समावेश होतो. 1913 साली या भागात 56.7 अंश इतके तापमान नोंदवण्यात आले होते.