राज्यात तापमानाचा पारा वाढणार, विदर्भात उष्णतेची लाट तर मुंबईतील तापमान 35 अंशावर जाण्याची शक्यता
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

राज्यात तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर विदर्भात(Vidarbha) उष्णतेची लाट आली असून मुंबईत (Mumbai) सुध्दा तापमान 35 अंशावर जाणार आहे. तसेच राज्यातील अन्य ठिकाणीसुद्धा उन्हाच्या चांगल्याच झळा लागत नागरिकांना लागत आहेत.

राज्यात 12 एप्रिल नंतर पावसाचे वातावरण झाले होते. त्यानंतर काही ठिकाणी पावसाने नागरिकांना झोडपलेसुद्धा होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट ही पाहायला मिळाली. त्यानंतर आता राज्यात तापमानाचा पारा वाढत चाललेला दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात तापमानाचा पारा वाढला असून अंगाची लाहीलाही होणाऱ्या उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. तर विदर्भात तापमानाचा पारा 45 अंशापर्यंत नोंदवण्यात आला होता. त्याचसोबत ब्रम्हपुरी, अकोला, चंद्रपूर, वर्धा या ठिकाणीसुद्धा तापमानाचा पारा वाढलेला दिसून आला.(उन्हाळ्यात हवी नितळ, मुलायम, निरोगी त्वचा? घरच्या घरी करा हे उपाय)

तर मुंबईतील तापमान पाहिल्यास आज आणि उद्या आकाश निरभ्र राहणार आहे. परंतु तापमान 35 अंशावर नोंदवण्यात येणार आहे. त्यातसोबत विदर्भात 25 एप्रिलला सुद्धा उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे.