Kashimira Road Rage: 18 वर्षीय तरूणाचा बेदम मारहाणीत मृत्यू; 8 जणांना पोलिसांनी केली अटक
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

ठाणे जिल्ह्यातील मिरा रोड (Mira Road) भागामध्ये 18 वर्षीय तरूणाने एका मोटार बाईकस्वाराला ओव्हर टेक केल्याच्या रागात आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी 8-9 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव शुभम भुवड (Shantaram Bhuvad) आहे. हा सारा प्रकार 29 ऑगस्ट म्हणजे रविवार रात्रीचा आहे.

शुभम मिरारोड मध्ये सिल्वर पार्क येथील त्याच्या घरी परत असताना त्याच्यासोबत हा प्रकार घडला. मीडीया रिपोर्ट्सनुसार, शुभम आणि एका आरोपीमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. Jatin Upoadhayay या अरोपींपैकी एकाची बाईक शुभमने ओव्हर टेक केली. सारे आरोपी हे अंदाजे 20 शी ते 30 शी मधील आहेत.

इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना काशमिरा पोलिस स्टेशनचे इन्सपेक्टर संजय हजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जतीन सोबत शुभमचा वाद झाल्यानंतर त्याने मित्रांना घटनास्थळी बोलावलं. मित्र देखील तातडीने तेथे आले आणि शुभमला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर सारे पळून गेले. हा प्रकार ओळख पटवण्यात आलेल्या चूकीमधून घडल्याची बाब देखील समोर येत होती पण पोलिसांनी ती शक्यता फेटाळून लावली आहे. (नक्की वाचा: घाटकोपर: अंतर्गत वादातून बर्थ डे दिवशीच मित्राची निर्घृण हत्या; पार्कमध्ये केले सपासप वार).

जखमी अवस्थेतील शुभमला जवळच्या लोकांनी रक्ताच्या थारोळ्यात पाहून नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले. त्याच्या नाकाला, छातीला, गुप्तांगाला मारहाण झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज स्कॅन करून आरोपींना अटक केली आहे. IPC 302, 147, 143 आणि 149 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.