कोकणात रस्ते मार्गाने प्रवास करणार्यांसाठी एक खूषखबर आहे. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील सगळ्यात धोकादायक म्हणून ओळख असलेला कशेडी घाट आता बोगद्याने जोडला जाणार आहे. कशेडी घाटातील बोगद्याचे काम पूर्ण झाले असून प्रवाशांसाठी या तील एक मार्गिका जून महिन्याच्या अखेरीला खुली केली जाणार आहे. खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड मधील पोलादपूर हे अंतर आता या बोगद्यामुळे अगदी सुरक्षितपणे 10 मिनिटांत कापता येणार आहे.
कशेडी घाटात अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांत दरड कोसळत असल्याच्या घटना समोर येतात परिणामी वाहतूकीसाठी तो अनेकदा बंद ठेवला जातो. वळणावळणाचा रस्ता असल्याने यामध्ये अपघाताच्या मालिका देखील झाल्या होत्या. पण आता त्याला पर्याय आणि सुरक्षित प्रवासासाठी मागील दोन बोगदा बनवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.
नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर कमी वेळेत पार होणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी अवघड वळणांमुळे जवळपास 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो. तर जड वाहनांसाठी जवळपास 40 मिनिटांचा वेळ लागतो. अवघड वळण घाटातून जात असल्याने अपघातांची भीती होती ती आता बोगद्यामुळे कमी झाली आहे. मुंबई गोवा हा चौपदरी रस्ता करण्याचे काम सुरू केल्यानंतर कशेडी घाट टाळून आता प्रवाशांना बोगद्याचा पर्याय खुला करून देण्यात आला आहे. Mumbai-Goa National Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल; Nitin Gadkari यांची माहिती .
मुंबई-गोवा रस्त्यातील खड्डे हा या मार्गावरील मोठा प्रश्न आहे. पण आता तो दूर सारला जाऊन नवा रस्ता प्रवाशांना खुला करून वाहतूक सुरळित करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी कामं सुरू झाली आहेत.