Kasba, Chinchwad Assembly Bypoll Results 2023: भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस आघाडीवर, कसबा मतदारसंघात हेमंत रासने पिछाडीवर, चिंचवड येथे काय घडतंय? घ्या जाणून
Ashwini Jagtap, Nana Kate, Hemant Rasane, Ravindra Dhangekar | (Photo Credits: Archived, edited)

कसबा विधानसभा (Kasba Assembly Bypoll Results 2023) पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजप उमेदवार हेमंत रासने यांची सुरुवातच काहीशी संथ झाल्याचे पाहायला मिळाले. पोस्टल बॅलेट मतमोजणी आणि पहिल्या फेरीच्या मतमोजणीतही हेमंत रासने (Hemant Rasane) हे पिछाडीवरच दिसले. त्या तुलनेत महाविकासाघाडी म्हणून रिंगणात असलेले काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मात्र सुरुवातीपासून 20-20 सामना खेळताना दिसत आहेत. धगेकरांनी पोस्टल बॅलेटपासूनचआघाडी घेतली आहे. जी पहिल्या फेरीतही कायम राहिल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला, चिंचवड (Chinchwad ) येथे भाजप उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आघाडीवर आहेत. तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) अगदीच किरकोळ फरकाने पिछाडीवर आहेत.

कसबा येथील विद्यमान स्थिती काय?

रविंद्र धंगेकर- 11,761मते (आघाडी)

हेमंत रासने- 10,673मते

चिंचवड येथील सध्यास्थिती काय?

अश्विनी जगताप- 11,222(आघाडी)

नाना काटे- 9,435

राहुल कलाटे- 3,942

(हेही वाचा, Pune Kasba Peth, Chinchwad Assembly By-Election Results 2023 Live Streaming: कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट-निवडणूक निकाल ABP Majha लाईव्ह स्ट्रीमिंग येथे पाहू शकता)

दरम्यान, सर्वच उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे. अशा वेळी जो उमेदवार आघाडीवर आहे त्याचे समर्थक ही आघाडी कायम राहणार असल्याचे सांगत आहेत. तर जो उमेदवार पिछाडीवर आहे त्या उमेदवारांचे समर्थक सांगत आहेत की, अजून आमचा प्रभाव असलेल्या प्रभागातील मतांची मोजणी सुरु झाली नाही. एकदा का ही मोजणी सुरु झाली की, आम्ही वेगाने प्रतिस्पर्ध्याची आघाडी मोडीत काढून पुढे जाऊ. त्या वेळी तुम्हाला चित्र बदललेले नक्की दिसेल. दोन्ही बाजूंनी जोरदार दावे-प्रतिदावे सुरु आहेत. अशात मतमोजणी मात्र अत्यंत हळुवारपणे पुढे सरकारता आहे.

कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वच जोरदार कामाला लागले होते. सत्ताधारी गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले होते. शिवाय एकनाथ शिंदे गटाचे जवळपास सर्वच आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर मंत्रीही प्रचारासाठी रिंगणात होते. महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे (ऑनलाईन), अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुनील केदार यांच्यासह सर्व नेते मैदानात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे सुद्धा शेवटच्याक्षणी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.