Vitthal Rukmini Mahapuja 2019: आषाढी एकादशी दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल रखुमाईची पूजा केल्यानंतर आज कार्तिकी म्हणजेच देव उठनी एकादशीच्या मुहूर्तावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शासकीय पूजा केली. पंढरपूरात आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्त मोठ्या संख्येने वारकरी हजर आहेत. दरम्यान रात्री अडीजच्या सुमारास विठ्ठल रखुमाईच्या शासकीय पूजेला सुरूवात झाली आणि ही पूजा विधीवत पार पडली. पाटील कुटुंबासोबतच सांगलीच्या ओमासे जोडप्याने विठ्ठालाची पूजा केली. यावेळेस सुनील आणि नंदा उमासे यांचा सत्कार करण्यात आला. ओमासे हे शेतकरी असून मागील 16 वर्ष पंढरीची वारी करत आहेत. Kartiki Ekadashi 2019 Messages: कार्तिकी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, Facebook आणि WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करुन साजरा करा 'देव उठनी एकादशी' चा सोहळा.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजा
आज कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांची मनोभावे पूजा केली. यावेळी राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असं साकडं विठूरायाला घातलं. pic.twitter.com/2fS4DPopFt
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 8, 2019
महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी सुखी राहू दे. बिघडलेलं ऋतूचक्र पुन्हा सुरळीत होऊ दे अशी प्रार्थना विठूरायाच्या चरणी केल्याचंं चंद्रकांत पाटील यांंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात सध्या सत्ता संघर्ष शिगेला असताना भाजपा आणि शिवसेनेमध्ये तणावाचे संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक शिवसैनिकांकडून चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाच्या शासकीय पूजेला विरोध करण्यात आला होता मात्र हा विरोध त्यानंतर मागे घेण्यात आला.
कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) किंवा देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) म्हणून देखील ओळखली जाते.भगवान विष्णूचं चातुर्मास संपवून कार्तिकी एकादशी दिवशी उठतात. त्यामुळे देव शयनी नंतर चार महिन्यांनी येणारी ही देव उठनी एकादशी देखील खास असते. निद्रा अवस्थेतून उठल्यानंतर पुन्हा नव्या शुभ पर्वाला, विवाह सोहळ्यांना सुरूवात होते.