कर्नाटक (Karnataka) पोलिसांनी सोनसाखळी चोरांच्या एका एचआयव्ही (HIV) बाधित टोळीला अटक केली आहे. या टोळीतील सर्वांनी मधल्या काही काळात बंगरुळूतील (Bengaluru) अनेक वेश्यांशी शारीरिक संबंध ठेवले होते, अशी माहिती चौकशीत पुढे आल्याचे पोलिसांनी शुक्रवारी (10 जून) सांगितले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आलेली माहिती अशी की, सोनसाखळी चोरांच्या टोळीतील सर्व जण हे 20 ते 30 वयोगटातील आहेत. या टोळीतील सदस्यांना आपण एचआयव्ही संक्रमित असल्याचे माहिती असतानाही त्यांनी बंगळुरुमधील अनेक वेश्यांशी शारीरिक संबंध ठवले. त्यांनी आपल्याला असा काही आजार अथवा संक्रमण असल्याची कोणतीही कल्पना संबंधित वेश्यांना दिली नाही. चौकशीत पुढे आलेली धक्कादायक माहिती अशी की या लोकांनी जवळपास 90 वेश्यांशी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले आहेत.
जयनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांनी सांगितले की, या साखळीचोरांनी कोणकोणत्या वेश्यांसोबत अशा प्रकारचे संबंध ठेवले आहेत याबाबत शोध सुरु आहे. या वेश्यांना आणि त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांना शोधण्याचे काम सध्या सुरु आहे. एचआयव्ही संक्रमित साखळी चोर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. (हेही वाचा, Unprotected Sex: भारतात गेल्या 10 वर्षांत असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे 17 लाखांहून अधिक लोकांना HIV ची लागण; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर)
पोलिसांनी साखळीचोरांकडून जवळपास 140 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सहा साखळ्या, दोन दुचाकी आणि इतर काही ऐवज जप्त केला आहे. आरोपींनी 26 मे रोजी नित्या नावच्या महिलेची सोनसाखळी जयनगर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरली होती. या चोरीचा तपास करता करता पोलीस या गुन्हेगारांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी ओरपींना सीसीटीव्हीच्या आधारे पकडले. यातील अनेक आरोपी आगोदर कारागृहात होते. कारागृहातून बाहेर पडल्यावर त्यांनी सोनसाखळी चोरण्यास सुरुवात केली.