कर्जत: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; तब्बल 11 महिन्यानंतर गुन्हा उघडकीस
Representational Image (Photo Credits: Facebook)

प्रियकराच्या मदतीने एका महिलेने पतीचा खून केल्याची घटना समोर येत आहे. कर्जत (Karat) तालुक्यातील मिरजगाव येथील ही घटना तब्बल 11 महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. अतिमद्यप्राशन केल्याने कोमात जावून पतीचा मृत्यू झाल्याचा बनाव महिलेने केला होता. मात्र तिच्या वागण्यातून पोलिसांचा संशय बळावत होता. त्यामुळे पोलिसांनी वैद्यकीय अहवाल मिळवले. त्यावरुन मृत्यू डोक्यात मार लागून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आणि ते गुन्हेगारांपर्यंत पोहचले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. (Woman Attacks Husband’s Lover: पतीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेवर पत्नीचा चाकूहल्ला; कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील घटना)

मृताची पत्नी आणि बावडकर यांचे प्रेमसंबंध होते. त्यात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढायचा असे दोघांही ठरवले. योजनेनुसार, पतीला भरपूर दारु पाजली आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात चुलीच्या फुंकणीने प्रहार केला. बेशुद्ध पडलेल्या प्रमोदला दोघांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र मार्च 2020 मध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे पत्नीने पोलिस जबाबात सांगितले. (Bhusawal: अनैतिक संबंधातून तरूणाची हत्या करून रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतदेह; जळगावच्या भुसावळ येथील घटना)

परंतु, तिच्या संशयास्पद वागण्यामुळे पोलिसांनी तपास सुरुच ठेवला आणि रुग्णालयाशी संपर्क करुन याबाबात अधिक माहिती मिळवली. माहिती हाती आल्यानंतर पोलिसांनी मृताच्या पत्नीची चौकशी सुरु केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर दोघांनीही गुन्हा कबुल केला. त्यानंतर पोलिसांनी खून करणे आणि पुरावे नष्ट करणे या आरोपाखाली दोघांनाही अटक केली.

दरम्यान, पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पार्टनरचा खून करुन तिचा मृतदेह बाथरुममधील 5भीतींत पुरला होता. तब्बल 4 महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.