Kargil Vijay Diwas 2020: आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी गौरवाचा दिवस आहे, भारत पाकिस्तान 1999 (Ind-Pak 1999 War) साली झालेल्या युद्धात भारतीय शूरवीरांना दुर्गम भागात लढून पाकिस्तान सैन्याला हरवले होते या दिवसाच्या सन्मानार्थ आजचा दिवस कारगिल विजय दिवस म्ह्णून साजरा केला जातो. या निमित्त आज सकाळपासून अनेकांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत ऑनलाईन पोस्ट केल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सुद्धा वीरजवानाच्या शौर्याचे स्मरण करत भारता साठीच्या या अभूतपूर्व दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासहित उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या नेत्यांचा समावेश आहे. कारगिल विजय दिवसाची यंदा 21 वी वर्षपूर्ती आहे, यानिमित्त महाराष्ट्रातील नेत्यांंनी केलेले ट्विट पहा.
शरद पवार
प्रतिकूल परिस्थितीत शत्रूवर विजय मिळवणाऱ्या भारतीय सैन्याच्या असामान्य शौर्याची आठवण #कारगिल_विजय_दिवस रूपाने प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे. देशत्याग व सैन्यदलाप्रति कृतज्ञ भावना उजागर करणाऱ्या कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद भारतीय वीरांना मानवंदना!#KargilVijayDiwas pic.twitter.com/3LfJjJk0Sz
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 26, 2020
उदयनराजे भोसले
Today let us remember the brave soldiers who sacrificed their lives for the land of the country.#CourageInKargil 🇮🇳
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 26, 2020
सुप्रिया सुळे
कारगिल युद्धादरम्यान अतुलनिय शौर्य, धाडस आणि पराक्रमाचे दर्शन जगाला घडवित जगाच्या इतिहासातील कठीण युद्धांपैकी एक असणारे युद्ध आपल्या जवानांनी जिंकले.पाकीस्तानी सैन्याचा निर्णायक पराभव झाला.या युद्धात शहीद झालेले व पराक्रम गाजविणाऱ्या जवानांना #VijayDiwas च्या निमित्ताने सॅल्यूट pic.twitter.com/DHaSnBvpjb
— Supriya Sule (@supriya_sule) July 26, 2020
राजेश टोपे
कारगील युद्धात शहीद झालेल्या भारतमातेच्या सर्व सुपुत्रांना शत् शत् नमन!
जय हिंन्द..! वन्दे मातरम्..!#KargilVijayDiwas #IndianArmy pic.twitter.com/8nRVgR2mio
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 26, 2020
चंद्रकांत पाटील
१९९९ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कारगिल युद्धात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता. या युद्धात हजारो शूरवीरांनी देश रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. pic.twitter.com/PJfOorSYNc
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 26, 2020
जितेंद्र आव्हाड
26 जुलै 1999 रोजी भारताने कारगिल द्रास क्षेत्रांत शत्रु पक्षावर चढाई करुन महत्वाच्या चौक्या पून्हा मिळवल्या व युद्धात निर्णायक विजय मिळवला
ह्यात लष्कराने व बोफोर्स तोफाँँनी महत्वाची कामगिरी बजावली
दैदिप्यमान कारगिल विजयी दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा pic.twitter.com/ZfsD9DNiDl
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 26, 2020
यशोमती ठाकुर
मातृभूमि साठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर जवानांना वंदन तथा शहीद जवानांना विनम्र अभिवादन..
कारगिल विजय दिवस चिरायु होवो.#KargilVijayDivas #kargildiwas #KargilVijayDiwas2020 pic.twitter.com/qIvoHyUk5c
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 26, 2020
दरम्यान, काही वेळापूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्य संरक्षण मंत्री श्रीपाद नाईक आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांसह दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शूरवीरांना नमन केले.