Kapil Sharma, Rajpal Yadav, Remo D’Souza | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Bollywood Death Threats News: कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma), अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा (Remo D’Souza) यांच्यासह बॉलीवूड सेलिब्रिटींना ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सेलिब्रिटीजच्या तक्रारींनंतर तपास सुरू करण्यात आल्याची पुष्टी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केली आहे. दरम्यान, कलाकारांना धमकी येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसलेल्या एका चोराने त्याच्यावर जीवघेना हल्ला केला. ज्यामध्ये अभिनेता गंभीर जखमी झाला आणि त्याला पुढचे काही दिवस मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. सध्या त्याला डिस्चार्ज मिळाला असला तरी, कलाकारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मधल्या काळात लॉनेन्स बिश्नोई टोळीने अभिनेता सलमान खान यास अनेकदा धमकी दिली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सलमान खान याने आपल्या घराच्या काचाही बुलेटफ्रूप करुन घेतल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानकडून धोका

प्राथमिक चौकशीनुसार, 'बिशनू' (बिश्नोई टोळी नव्हे, ही कोणती वेगळीच टोळी आहे) म्हणून स्वाक्षरी केलेले ईमेल पाकिस्तानमधून आले असावेत असे मानले जाते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कपिल शर्मा आणि रेमो डिसोझा यांच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, तर राजपाल यादव याने त्यासाठी स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा, ‘The Great Indian Kapil Show’: नेटफ्लिक्सने कपिल शर्माच्या कॉमेडी शोच्या सीझन 1 मधील 6 विशेष भागांची केली घोषणा)

कायदेशीर कारवाई आणि तपास

कपिल शर्माच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 351 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमक्यांमागील व्यक्ती किंवा गट ओळखण्यासाठी अधिकारी सध्या ईमेलच्या स्त्रोताचा शोध घेत आहेत. (हेही वाचा, कोट्यवधींच्या कर्जात बुडाला अभिनेता Rajpal yadav, बॅंकेकडून मालमत्ता जप्त)

अभिनेत्री सुगंधा मिश्रा हिलाही धमकी

दरम्यान, पुरुष कलाकारांव्यतिरिक्त, महिला कलाकार, अभिनेत्री सुगंधा मिश्रा हिने अशाच प्रकारच्या धमक्या देत ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात तक्रार दाखल केली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींना धोका

बॉलीवूडच्या या प्रमुख व्यक्तींना लक्ष्य करणाऱ्या धमकीच्या ईमेलमुळे त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. तपास सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपायांचे मूल्यांकन आणि अंमलबजावणी केली जात असल्याचे आश्वासन मुंबई पोलिसांनी दिले आहे.

मुंबई पोलिसांकडून तपास सुरु

कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव हे विनोदी अभिनेते आहेत. त्यामध्ये यादव हा विविध चित्रपट, नाटकांमधून अभिनय करतो. तर शर्मा याने एखादा अपवाद वगळता त्याने चित्रपटांमध्ये फारसे काम केले नाही. तो 'द कपील शर्मा' शोमुळेच अधिक प्रसिद्धीच्या झोतात असतो. तर रेमो डिसोझा हा नृत्यदिग्दर्शक आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम करणाऱ्या विविध वाहिन्यांवर तो पंच म्हणूनही दिसतो. सुगंधा मिश्रा ही अभिनेत्री कॉमेडी आणि गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे.