
कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. नुकतेच तिने असे काही वक्तव्य केले की त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी आणि देशातील अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. कंगनाच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि काही लोकांनी तिच्याकडून पद्मश्री काढून घेण्याची मागणीही केली होती. १९४७ साली देशाच्या स्वातंत्र्याला ‘भीक मागणे’ म्हणत वादात सापडलेली ‘पंगा गर्ल’ कंगना राणौत हिने पुन्हा एकदा या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. कंगना पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार आहे, मात्र त्यासाठी तिने एक अट ठेवली आहे.

सध्या होत असलेल्या वादावर तिने आपले मत मांडले आहे तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'या मुलाखतीत सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगण्यात आल्या होत्या की स्वातंत्र्यासाठीचे पहिले संघटित युद्ध १८५७ मध्ये लढले गेले होते. सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांच्या बलिदानांसोबतच ते बोलले गेले. मला 1857 ची माहिती आहे पण 1947 मध्ये कोणती लढाई लढली गेली याची मला अजिबात कल्पना नाही. (हे ही वाचा Bollywood Drug Case: कंगना रनौत हिची ड्रग्स प्रकरणी चौकशी का झाली नाही? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा सवाल.)

कंगनाने पुढे लिहिले की, 'मी राणी लक्ष्मीबाई सारख्या शहीदावर एका फिचर फिल्ममध्ये काम केले आहे. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धावर बरेच संशोधन केले. राष्ट्रवादासोबत दक्षिणपंथाचा उदय झाला पण ते अचानक नष्ट कसा झाला? आणि गांधींनी भगतसिंगला का मरू दिले? इंग्रजांनी फाळणी रेषेवर काढलेले स्वातंत्र्य साजरे करण्याऐवजी भारतीय एकमेकांना का मारत होते? मला या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, ज्यासाठी मला मदत हवी आहे.

कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर लांबलचक पोस्ट शेअर केल्या आहेत. कंगना एवढ्यावरच थांबली नाही, तिने पुढे लिहिले- 'ज्यापर्यंत 2014 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, मी विशेष मानते आम्हाला दाखवण्याचे स्वातंत्र्य मिळाले असले तरी भारताच्या चेतना आणि विवेकाला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तिने आपले अनेक काही मुद्दे या विधानावर मांडले आहे. तसेच आज पहिल्यांदा लोक इंग्रजी न बोलता किंवा छोट्या शहरातून आलेले किंवा मेड इन इंडिया उत्पादन बनवल्याबद्दल आपला अपमान करू शकत नाही. त्या मुलाखतीत सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. लेकिन जो चोर हैं उनकी तो जलेगी कोई बुझा नहीं सकता। जय हिंद”