शिवसेना महिला नगरसेवकाच्या जावयाने केली पत्नीची हत्या; अंबरनाथ येथील मलंगगड परिसरातील घटना
murder | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

घरगुती वाद टोकाला गेल्यानंतर राज पाटील नावाच्या व्यक्तीने स्वत:च्या पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. वैशाली पाटील-भोईर (Vaishali Patil) असे मृत पत्नीचे नाव आहे. ही घटना अंबरनाथ (Ambarnath) तालुक्यातील मलंग गड (Malang Gad) परिसरात असणाऱ्या वाडी गावात घडली. राज पाटील हा कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivali Municipal Corporation) शिवसेना महिला नगरसेवक (Shiv Sena Women Corporator) विमल भोईर (Vimal Bhoir) यांचा जावई आहे. विमल भोईर यांची कन्या वैशाली हिचा आणि राज पाटील याचा सुमारे दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

प्राप्त माहितीनुसार, वैशाली आणि राज यांच्यात गेली अनेक वर्षे कौटुंबिक वाद होता. पत्नी वैशाली ही आवडत नसल्याने राज पाटील याचा पत्नीसोबत वाद होता. या वादातून दोघांमध्ये अनेकदा भांडणे होत असत. शुक्रवारी सायंकाळीही त्यांच्यात काही कारणावरुन भांडण झाले. हे भांडण टोकाला गेले. त्यातून राज पाटील याने पत्नी वैशाली हिची धारधार शस्त्राने हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी राज पाटील हा स्वत:हून पोलिसांमध्ये हजर झाला. तसेच, आपण केलेल्या कृत्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. (हेही वाचा, शिवसेनेच्या दिवंगत नेत्याच्या पत्नीची तुरुंगात आत्महत्या?)

आरोपी राज पाटील याने दिलेल्या माहितीनुसार हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केरुन तपास सुरु केला आहे. तर, वैशाली पाटील-भोईर हिचा मृतदेह ताब्यात घेऊन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. पोलिसांनी आरोपी राज पाटील याला अटक केली आहे.

दरम्यान, वैशाली पाटील हिची पतीनेच हत्या केल्याची माहिती कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधान आले. सध्या घटना घडलेल्या मलंगगड परिसरात वातावरणात तणाव आहे.