Hospital I| Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोनाबाधित रुग्णांकडून अतिरिक्त पैसे उकळल्याचे प्रकारांचा दिवसागणिक पर्दाफाश केला जात आहे. याच दरम्यान आता कल्याण येथील एका रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या व्यक्तीकडून बिलाची अतिरिक्त रक्कम उकळली गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कल्याण-डोंबिववली महापालिकेने रुग्णालयाला दणका देत त्यांचा परवाना रद्द केला आहे. महापालिकेने पुढे असे ही म्हटले आहे की, श्रीदेवी रुग्णालयात रुग्णांकडून अधिक बिलाची रक्कम घेत जात असल्याच्या यापूर्वी सुद्धा आल्या होत्या.

रुग्णांकडून बिलाची अधिक रक्कम उकळली जात असल्याने महापालिका कमिशनर डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या निर्देशनानुसार सुनिल पवार यांनी 31 ऑगस्ट पर्यंत परवाना रद्द केला आहे. त्याचसोबत रुग्णालयाने अधिकाऱ्यांच्या नियमाचे पालन करावे असे आदेश सुद्धा दिले आहेत. रुग्णालयांनी हिमोडायलेसिसची सुविधा रुग्णांचा द्यावी. परंतु नव्या रुग्णांनाअॅडमिट करुन घेण्यास बंदी असल्याच्या सुचना दिल्या होत्या.(ठाणे येथे कोरोनाचे आणखी 1284 रुग्ण आढळले तर 26 जणांचा बळी, COVID19 चा आकडा 1,13,884 वर पोहचला)

महापालिकेने रुग्णालयाला यापूर्वी सुद्धा खासगी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस धाडत इशारा सुद्धा दिला होता. केडीएमसीने असे ही म्हटले आहे की, त्यांच्याकडे Flying Squad यांनी धाव घेत रुग्णालयात सुविधांची गैरसोय असल्याचे म्हटले होते. तर रुग्णालयाकडून नागरि विभागाला ते कोविडच्या रुग्णांवर उपचार करत असल्याचे सांगितले सुद्धा नव्हते. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी जुलै महिन्यापासूनच 24 बेड्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

नोटीस धाडल्यानंतर सुद्धा रुग्णालयाकडून रुग्णांची लुटमार सुरुच होती. दरम्यान, सरकारने कोरोनाहबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी किती पैसे घ्यावेत याचे दर आधीच ठरवले आहेत. परंतु तरीही रुग्णालयाने अशा पद्धतीने नागरिकांकडून बिल उकळली. तसेच तपासणी करण्यासाठी आलेल्या टीमसोबत सुद्धा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे वागूण केल्याचे समोर आले आहे.