ठाणे येथे कोरोनाचे आणखी 1284 रुग्ण आढळले तर 26 जणांचा बळी, COVID19 चा आकडा 1,13,884 वर पोहचला
महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 1284 रुग्ण आढळून आल्यानंतर आकडा 1,13,884 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाने रविवारी दिली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा 3240 वर गेला असून आणखी 26 जणांचा जंतुसंसर्गामुळे बळी गेला आहे
महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 1284 रुग्ण आढळून आल्यानंतर आकडा 1,13,884 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाने रविवारी दिली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा 3240 वर गेला असून आणखी 26 जणांचा जंतुसंसर्गामुळे बळी गेला आहे. त्याचसोबत कल्याण येथे कोविड19 च्या रुग्णांचा आकडा 26,405 वर, ठाण्यात 24,329 रुग्ण तर मिरा-भायंदर येथे 11,519 रुग्ण आढळले आहेत. त्याचसोबत काही रुग्ण हे जिल्ह्यातील उर्वरित भागातील आहेत.
शनिवारी, कल्याण येथे कोरोनाचे आणखी 421 रुग्ण आढळले तर नवी मुंबईत 389, ठाण्यात 135 आणि मिरा-भायंदर येथे 124 रुग्णांची नोंद झाली आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, कल्याण येथे एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजेच 10 जणांचा बळी गेला आहे. आता येथे 12,733 अॅक्टिव्ह रुग्ण असून 97,911 जणांची प्रकृती सुधारली आहे.(COVID-19 Cases in Maharashtra: मुंबई, पुणे, नाशिक, रायगडसह तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण? पाहा आजचे ताजे अपडेट्स)
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट 85.97 टक्के तर मृत्यू दर 2.85 टक्के आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 16.94 टक्के रुग्ण हे ठाण्यातील आहे. बाजूला असलेल्या पालघर जिल्ह्यात आणखी 347 रुग्णांची नोंद झाल्यानंतर आकडा 21,918 वर पोहचला आहे, त्याचसोबत शनिवारी पालघर जिल्ह्यात आणखी दोन जणांनी कोरोनामुळे आपली जीव गमावला असून येथे एकूण 444 जणांचा बळी गेला आहे.(Coronavirus: मुंबई महापालिका 320 जणांवर करणार Oxford Vaccine चाचणी)
दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल (22 ऑगस्ट) राज्यात 14,492 नवे रुग्ण आढळले असून 297 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 61 हजार 942 इतकी झाली आहे. आतापर्यंत 4,80,114 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय सध्या राज्यात 1 लाख 69 हजार 516 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2020 01:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

