Coronavirus Vaccine | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणात आणणारी लस चाचणी महाराष्ट्रातही होणार आहे. मुंबई महापालिका ( Mumbai Municipal Corporation) हद्दीतील केईएम (KEM) आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये (BYL Nair Hospital) ही चाचणी केली जाणार असल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार ऑक्सफर्ड विद्यापीठ निर्मिती कोरोना व्हायरस लस (Oxford Coronavirus Vaccine) चाचणी मुंबई महापालिका (BMC) करणार आहे. दरम्यान, ऑक्सफर्डने तयार केलेल्या लसीच्या मानवी चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदविण्यासाठ अनेक लोक उत्सुक असल्याचेही सांगितले जात आहे.

मंबई महापालिका मानवी चाचणीसाठी जवळपास 320 जणांची निवड करणार असून, त्यांना सुरुवातीला ०.५ एमएलचा डोस दिला जाणार आहे. हा डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांना सौम्य ताप येऊ शकतो असे सांगितले जात आहे. दरम्यान, या चाचणीचे काही साडी इफेक्ट आहेत का हेही पाहिले जाणार आहे. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.

विशेष म्हणजे या मानवी चाचणीत सहभागी होण्यासाठी उत्साही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेकडे अथवा केईएम रुग्णालयात फोन करुन किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहूनही लोक आपण चाचणीसाठी तयार असल्याचे सांगत आहेत. (हेही वाचा, COVID-19 Vaccine Update: रशिया मध्ये कोरोना व्हायरस वरील 'Sputnik V' लसीच्या पहिल्या बॅचचे उत्पादन)

दरम्यान, मानवी चाचणी करण्यासंबंधी केईएम आणि बीवायएल नायर हॉस्पिटल समितीने काही प्रश्न उपस्थित करुन माहिती मागवली आहे. त्यामुळे ऑक्सफर्डच्या लस चाचणीस विलंब होत असल्याचे समजते. दोन्ही रुग्णालयांतील समितीला नीतीविषयक काही प्रश्न आहेत. त्यामुळे त्यांनी ही माहिती मागवली आहे.

दुसऱ्या बाजूला भारतातही कोरोना व्हायसस लस शोधण्याचे काम सुरु आहे. भारतातील सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ही कंपनी ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन करणार आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेका विकसीत करत असलेल्या लसीचे नाव कोव्हिशिल्ड असे ठेवण्यात आले आहे.