फेब्रुवारी महिना सुरू झाला की मुंबईकरांना दक्षिण मुंबईतील लोकप्रिय काळाघोडा फेस्टिवलचे (Kala Ghoda Festival) वेध लागतात. काळा घोडा फेस्टिवल हा देशातील सर्वात मोठा स्ट्रीट फेस्टिवल समजला जातो. यंदा 1 ते 9 फेब्रुवारी दरम्यान हा फेस्टिवल रंगणार आहे. मग नव्या महिन्याच्या पहिल्याच विकेंडला तुम्ही काळा घोडा फेस्टिवलला भेट देण्यासाठी बाहेर पडणार असाल तर जाणून घ्या उद्या पासून सुरू होणार्या या फेस्टिवलला पोहचण्यासाठी मुंबई लोकल, बेस्ट बसने कसे पोहचाल हे जाणून घ्या.
यंदाही काळा घोडा फेस्टिवलमध्ये डिझाईन, सिनेमा, संगीत, नृत्य, साहित्य यांसारख्या कलांचा अद्भूत नजारा आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावर्षी या फेस्टिवलचे 21 वे वर्ष आहे. त्यामुळे तरूणाई मध्ये या फेस्टिवलबद्दल विशेष आकर्षण आहे. यंदा तुम्ही देखील तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर पडणार असाल तर पहा यंदा काळा घोडा फेस्टिवलमध्ये काय काय आहे आकर्षण.
लोकल ट्रेनने काळा घोडा फेस्टिवलला कसे पोहचाल?
लोकल ट्रेनने काळा घोडा परिसरात पोहचण्यासाठी पश्चिम रेल्वे स्थानकावरून चर्चगेट स्टेशन जवळ आहे. तर मध्य रेल्वे मार्गावर सीएसटीएम स्टेशन जवळ आहे. या दोन्ही स्थानकावरून चालत, बेस्ट बस किंवा टॅक्सीच्या मदतीने तुम्ही पोहचू शकता.
सीएसटीएम आणि चर्चगेट स्थानकावरून बेस्ट कडून काही रिंग रोड बसेसची देखील सोय केली आहे.
काळा घोडा हा दक्षिण मुंबईतील एक प्रसिद्ध भाग आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेमध्ये काळाघोडा भागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच हा फेस्टिवल मोफत असल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची गर्दी असते.