Shiv Sena, NCP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus) संकटाने डोके वर काढले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. तसेच प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळा, गर्दी करू नका, असे वारंवार सांगत आहे. मात्र, तरीही जुन्नर (Junnar) तालुक्यात आळेफाट्याजवळच्या चाळकवाडी टोलनाक्यावर स्थानिक नेत्यांनी गर्दी जमवत आंदोलन केले. दरम्यान, कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याने शिवसेनेसह (Shiv Sena) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जवळपास 100 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाट्याजवळच्या चाळकवाडी टोलनाका महामार्गवरील काम गेल्या 2 वर्षांपासून अपूर्ण आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी हा टोल नाका बंद पाडला होता. पण 1 एप्रिलला टोलनाका सुरू होणार अशी चर्चा सुरु झाली. त्यानंतर माजी आमदार शरद सोनावणे कार्यकर्त्यासह टोलनाक्यावर जमा होऊन आंदोलन केले. या आंदोलनाला जवळपास शंभर कार्यकर्ते उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे, यावेळी कोरोना नियम पायदळी तुडवल्याने शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, जुन्नरचे माजी सभापती आनंद रासकर यासह 100 जणांवर आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे , अशी माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Radhakrishna Damani Buy Property in Mumbai: DMart चे राधाकृष्ण दमानी यांनी मुंबईच्या मलबार हिल्समध्ये तब्बल 1,001 कोटींमध्ये खरेदी केला दुमजली बंगला

राज्यात आज 49,447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 37821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2495315 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 401172 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे.