Arrest pixabay

मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी पूर्वेला (Jogeshwari East) वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करणाऱ्या नोकराला मेघवाडी पोलिसांनी काही तासाच्या आत अटक केली आहे. जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी असलेल्या मजास वाडीतील (Majas Wadi) समर्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये सुधीर कृष्णकुमार चिपळुणकर (७२) आपल्या पत्नी सुप्रिया (६५) सह रहात होते. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या नोकरानी या दाम्पत्यावर जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सुधीर चिपळुणकर यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी या गंभीर जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे या नोकराला १५ दिवसापुर्वीच घरकामात मदत करण्यासाठी घरात कामाला ठेवले होते.

या घटनेनंतर मेघवाडी पोलिसांनी हत्या आणि हत्येच्या प्रयत्न हा गुन्हा दाखल केला आणि अवघ्या काही तासात आरोपी पप्पू गवळीला अटक करण्यात त्यांना यश आले. आरोपी पप्पू गवळी हा अंधेरी पश्चिम येथील येथील रहिवासी असून हत्येनंतर पप्पू हा पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला दादर रेल्वे स्थानकावरुन पोलिसांनी अटक केली आहे. पप्पू गवळीवर कलम ३०२, कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आहे. (Kanpur : कानपूर अग्नीकांड प्रकरणात JCB चालकाला अटक; SDM आणि लेखपाल निलंबित)

सध्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून गुन्हा का केला गेला ? हे अद्याप स्पष्ट झाले नसून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकु देखील अद्याप हस्तगत करण्यात आलेला नाही. पोलिसांनी पप्पू गवळी अटक केली असून त्यांच्याकडून हत्येच्या उद्देशाबद्दलची माहिती काढण्याचा प्रयत्न पोलीस करतील.  या घटनेमुळे मजास वाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.