Jitendra Awhad Stages Unique Protest (फोटो सौजन्य - ANI)

Maharashtra Budget Session 2025: आजपासून महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly Budget Session) आज सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मोठ्या संख्येने हजेरी लावली. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातकड्या घालून विधानभवन संकुलात (Vidhan Bhavan Complex) एन्ट्री केला. जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून महायुती सरकारविरोध निषेध नोंदवला. तसेच त्यांच्या या नाट्यमय कृतीमागील कारण जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली.

पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होत आहे. जे कार्यकर्ते आणि व्यक्ती बोलण्याचे धाडस करतात त्यांना फौजदारी आरोपांद्वारे गप्प बसवले जात आहे. स्वतःला व्यक्त करण्याचा आपला संवैधानिक अधिकार धोक्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येकाला त्यांचे मत मांडता आले पाहिजे. आम्हाला हा अधिकार नाकारला जात असल्याने, मी प्रतीकात्मकपणे या बेड्या घालत आहेत. (हेही वाचा -Maharashtra Budget Session: आजपासून सुरु होणार महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; 10 मार्च रोजी अजित पवार सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प)

जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून केली विधिमंडळात एन्ट्री, पहा व्हिडिओ -

अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या अत्याचारांवर वेधले लक्ष -

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी अमेरिकेत भारतीयांवर उद्धभवलेल्या संकटावर भाष्य केले. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणांवर त्यांनी जोरदार टीका केली आणि दावा केला की, त्यांनी अनेक भारतीयांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. ट्रम्प यांच्या प्रतिबंधात्मक व्हिसा नियमामुळे अनेक भारतीय कुटुंबाचा संसार उद्धवस्त झाला आहे.

स्थलांतरित भारतीयांबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले की, त्यांना विमानात कोंबले जात आहे, बेड्या ठोकल्या जात आहेत, त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे. हा भारतीयांचा अपमान आहे. महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांना याचा फटका बसला आहे. तसेच अमेरिकेत भविष्य घडवू इच्छिणाऱ्या तरुण भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी नमूद केलं.