भाजप आमदार भाजपच्याच तिकीटावर निवडून येणार नाहीत- जयंत पाटील
Jayant Patil | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रातील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार स्थिर आहे. जे राजस्थन, मध्य प्रदेश अथवा इतर ठिकाणी भाजपने घडवलं ते महाराष्ट्रात घडणार नाही. महाविकासआघाडी भक्कम आहे. महाराष्ट्रात असं घडलं तर भाजप (BJP) आमदार भाजपच्याच तिकीटावर निवडून येणार नाही. त्यामुळे तीन पक्षांच्या ताकदीसमोर महाराष्ट्रात इतर कोणत्याच उमेदवाराला निवडून येणे सहज शक्य नाही, असा थेट इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विरोधकांना दिला आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते.

या वेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात सरकार अस्थिर करणे वाटते तितके सोपे नाही. पक्षांतर बंदी कायदा असतो. तो पाळायचा तर आमदारांना राजीनामा द्यावा लागतो. आजची स्थिती अशी आहे की, महाराष्ट्रात तिन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे कोणत्यही आमदाराने राजीनामा दिला आणि तो परत निवडणुकीला सामारो गेला तर त्याची निवडून येण्याची शक्यता कमी आहे. इतकेच नव्हे तर भाजपचा विद्यमान आमदार जरी भाजपच्याच तिकीटावर उभा राहिला तरीसुद्धा तो निवडून येणार नाही. (हेही वाचा, महाराष्ट्रात कोणाचे किती बळ? हे समजून घेण्यासाठी पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे- चंद्रकांत पाटील )

Bakri Eid 2020: गणेशोत्सव प्रमाणेच बकरी ईद ही साजरी करू द्यावी Naseem Khan यांची मागणी - Watch Video

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेश राज्यामध्ये काँग्रेसच्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना पक्षात घेऊन कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडले. भाजपने कर्नाटक आणि मिझोराममध्येही असेच केले आहे. गोव्यातही असेच केले होते. त्यानंतर आता राजस्थानमध्येही असेच चित्र आहे. मात्र, इथे भाजप पडद्यावर दिसत नाही. इथे सचिन पायलट यांच्या रुपात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रातही असेच घडणार की महाराष्ट्रातील महावकासआघाडी भाजपला अयशस्वी करणार याबाबत उत्सुकता आहे.