Maratha Reservation: जालना जिल्ह्याता एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत सरकारला दोन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. मराठा आरक्षण मागणीच्या नैराश्यातून तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली आहे. राज्यात महिन्याभरात आरक्षणाच्या मागणीकरिता तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. जालन्यातील या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे
मीडिया रिपोर्टनुसार, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जानेफळ मिसाळ गावात ही घटना घडली आहे. मनोहर आत्माराम मिसाळ असं मृत तरुणाचे नाव होते. मनोहर दोन महिन्यांपासून मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सक्रिय होता. अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलनात सहभाग दाखवला होता. मनोहरचं लग्न अडिच वर्षांपुर्वी झालं त्याला एक वर्षाचा मुलगा देखली आहे, काही दिवसांपासून ठिकठिकाणी टायर जाळून निषेध केला जात होता. आंदोलना दरम्यान त्याने रस्त्यात जाळलेल्या टायरवर उडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलकांनी त्यालला समजावून सांगितले.
त्यांनतर आज त्यांनी घरात असताना शेतातील फवारणीसाठी आणलेले किटकनाशक प्यायले.विष प्राशन केल्याचे समजताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरु करताच त्याचा दुर्दैवी अंत झाला. डॉक्टरांनी त्याल मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शांतता पसरली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.