Tractor | Representational Image (Photo Credits: Pixabay)

विधवा (Widowed) सून (Daughter-in-law) आणि तिच्या प्रियकराच्या अंगावर ट्रॅक्टर (Tractor) घालून अपघात घडल्याचा बनाव रचल्याचे पुढे आले आहे. ही घटना जालना (Jalna Distric) जिल्ह्यात असलेलल्या अंबड ( Ambad Taluka) तालुक्यातील चापडगाव (Chapadgaon) परिसरात घडली. भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृतांची नावं आहेत. या प्रकरणी मारिया यांचा दिर विकास बथवेल लालझरे आणि सासरा बथवेल लालझरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मारिया लालझरे यांच्या पतींनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्यानंतर त्या कुटंबासमेवत राहात होत्या. लालबावटा संघटनेचे चापडगाव अध्यक्ष भागवत प्रल्हाद हरबक यांच्याशी प्रेमसंंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधास दिल विकास लालझरे आणि सासरा बथवेल लालझरे यांचा विरोध होता. मारिया आणि भागवत असे दोघे मिळून दुचाकीवरुन संघटनेच्या मेळाव्यासाठी कुंभारपिंपळगाव येथे बुधवारी गेले होते. दरम्यान, घरुन निघाल्यानंतर अवघ्या दीड-दोन तासातच त्यांच्या अपघाताची बातमी कुटुंबीयांना समजली. (हेही वाचा, पुणे: मैत्रिणीला भेटायला गेला, बायको-मुलांनी घरी नेऊन बदडला; नवऱ्याची पोलिसात फिर्याद, पिंपरी चिंचवड येथील घटना)

जखमी अवस्थेत असलेल्या भागवत हरबक यांना रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांनी त्यांच्या आईला सांगितले की, विकास बथवेल लालझरे याने मुद्दामहूनच त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. उपचारादरम्यान, भागवतयांचा मृत्यू झाला. तर मारिया यांचा रुग्णालयात घेऊन जात असतानाच मृत्यू झाला.

भागवरत हरबक यांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन मारिया यांचा सासरा बथवेल आणि दिर विकास लालझरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी विकास आणि बथवेल या दोघांनाही अटक केली आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.