schoolchild | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

जळगाव (Jalgaon) मधील जामनेर (Jamner) शहरात एका 12 वर्षाच्या मुलाने अभ्यास करताना वडील त्रास देतात अशी तक्रार घेऊन थेट पोलीस स्टेशनचे दार ठोठावले आहे. इतकंच नव्हे तर वडिलांवर गुन्हा दाखल करावा म्हणून त्याने पोलीसांसमोर धरणाच दिला, ज्यामुळे पोलिसही गोंधळात पडले. या अनोख्या मुलाचे नाव अजय लक्ष्मण कुमावत (Ajay Kumavat) असे आहे. बुधवारी म्हणजेच 31 जुलै ला त्याने भिजलेल्या अवस्थेत हाफ पँट व बनियान घालून तो पोलिसांपाशी आला होता. त्याची ही अवस्था बघून खाकी वर्दीतल्या पोलिसांचे सुद्धा डोळे पाणावले आणि त्यांनी या मुलाला मदत म्हणून नवे चप्पल आणि कपडे देऊ केले आहेत. मुंबई: टाटानगर येथील विद्यार्थी दररोज पार करताहेत मृत्यूचा सापळा; पाहा अंगावर रोमांच उभे करणारा व्हिडिओ

मटाच्या वृत्तानुसार अजय हा जामनेर शहरातील भुसावळ रोड भागात आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत राहतो. आई शेतात मजुरी करते तर वडील मिस्त्री म्ह्णून काम करतात. जवळच असलेल्या शेंगोळे आश्रमशाळेत तो भावंडांसह शिकतो.आपण अभ्यास करत असताना वडील सतत त्रास देतात, आईने मध्यस्थी केल्यास ते आईला सुद्धा मारहाण करतात अशी त्याची तक्रार होती. ही तक्रार घेऊन त्याने भर पावसात बुधवारी पोलिसांकडे धाव घेतली. त्याची अवस्था पाहून पोलिसांना त्याची दया आली. आणि त्याच आत्मीयतेने त्यांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याला नाव, गाव विचारात शांत करण्याचा प्रयत्न केला पण अजय काही केल्या ऐकायला तयार नव्ह्ता त्याने आपल्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच आपल्याला मोठ्या पोलिसांना भेटायचे आहे असे तो वारंवार म्हणत होता.

दरम्यान हा गोंधळ ऐकून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे त्याठिकाणी आले त्यांनी अजयला शांत करून त्याची पुन्हा विचारपूस केली.अजयने सारी हकीकत सांगितल्यावर त्याच्या तक्रारीची दखल घेऊन इंगळे यांनी त्याच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्याच्या वडिलांना समज दिली.