जालना लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: शिवाजीराव अढळराव विरुद्ध अमोल कोल्हे यांच्यात मताधिक्यांची रंगत लढणार, कोणाला मिळणार खासदार पद?
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Jalana Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. या मतदारसंघातून शिवसेना-भाजप युती (Shivsena-BJP) उमेदवार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), काँग्रेस (Congress) उमेदवार विलास औताड (Vilas Autad) आणि वंचित बहुजन आघाडी (BVH) पक्षाचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे (Sharadchandra Wankhede) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, आघाडीसाठी प्रतिकुल अंदाज दर्शवले आहेत. याच पार्श्वभुमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी ठरणार आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

जालना मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. या मतदारसंघात रावसाहेब दानवे, काँग्रेसचे विलास औताडे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्यात तिरंगी लढत झाली. दानवे भाजप प्रदेशाध्यक्ष असल्याने जालना मतदार संघातील लढतीकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले आहे. या आधी सलग दोन वेळा आमदार आणि सलग चार वेळा खासदार राहिलेले दानवे पुन्हा लोकसभेत जाण्यासाठी जोरदार तयारी केली होती. दरम्यान तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 56.57 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती.

(Loksabha Elections 2019 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; महाराष्ट्रातील चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, लातूर मतदारसंघ उमेदवारांचा समावेश)

तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरातील 116 जागांसाठी मतदान पार पडले. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अन्य पक्षाच्या उमेदवारांनी यंदा जोरदार प्रचारसभेतून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आज येणाऱ्या निकालावरुन महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय मंडळींच्या भविष्याचा फैसला मतदार करणार आहेत.