
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलेला 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या परळी शाखेचा धनादेश वटलाच नाही. त्यामुळे ते कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन खरेदीबदल्यात हा धनादेश जमीन मालकाला देण्यात आला होता. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात येत्या डिसेंबर महिन्यात आरोपपक्ष दाखल करु, असे राज्य सरकारने मंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला ही माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
जगमित्र साखर कारखान्यासाठी सुमारे तीन हेक्टर बारा आर जमीन खरेदी करण्यासाठी आली होती. ही जमीन बीड जिल्ह्यतील तळणी तालुक्यातील अबाजोगाई एथील रहिवासी मुंजा किसनराव गीते यांची होती. या जमीनीच्या बदल्यात धनंजय मुंडे यांनी गीते यांना ५० लाख रुपयांचा धनादेश दिला होता. तसेच, त्यासोबतच गीते यांच्या मुलास साखर कारखान्यात नोकरी देण्याबाबत हमीही देण्यात आली होती.
दरम्यान, गीते यांनी हा धनादेश बँकेत भरला असता तो वटलाच नाही. त्यामुळे गीते यांनी मंडे आणि जगमित्र साखर कारखाना व्यवस्तापनाकडे पाठपुरावा केला. ते सुमारे तीन वर्षे सातत्याने पाठवपुरवा करत राहिले. मात्र, इतके करुनही त्यांना पैसे मिळालेच नाहीत. अखेर कंटाळून गीते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली. दरम्यान, न्यायालयाची पायरी चढण्यापूर्वी गीते यांनी पोलिसांत तक्रार देऊन पाहिली. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयीन लढा देण्याचे ठरवले.
दरम्यान, न्यायालयाने राज्य सरकारकडे विचारणा केली की, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार आहे. तसेच, आरोपपत्र कधी दाखल करणार आहे. यावर उत्तरादाखल माहिती देताना पुढच्या महिन्यात (डिसेंबर) राज्य सरकार गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.