Mumbai Rains Update: मुंबईत आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार, हवामान खात्याचा अंदाज
Rain Update (Photo Credits: ANI)

Mumbai Monsoon 2019: आज पहाटे पासून मुंबईसह ठाणे, पालघर मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर आणि रेल्वेमार्गावरही झालेला दिसत आहे. मुंबईत पावसाचा जोर आज दिवसभर राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहेत.

सकाळपासून जोर पकडलेल्या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे वाहतुकीची कोंडी झाल्याचेही पाहायला मिळत आहे. यंदाचा पाऊस हा जवळपास महिनाभर उशिराने सुरु झाल्यामुळे मुंबईकर अगदी आतुरतेने पावसाची वाट पाहात होता.

आज पहाटेपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईकर सुखावला तर आहेत मात्र वाहतुककोंडी, रेल्वेमार्गावरील समस्येमुळे आज चाकरमान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.

Mumbai Rains Update: मुंबई सह उपगनरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; पहिल्याच पावसात पाणी साचण्यास सुरुवात

कोकण आणि गोव्यातही पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसत आहे. तर मुंबई आणि उपनगरांमध्येसुद्धा 28 ते 30 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.