समाजातील दुर्बल घटकांना प्रगतीपथावर पोहोचविण्यासाठी आणि राज्याला गतिमान करण्यासाठी हे सरकार कटीबद्ध असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (15 ऑगस्ट) दिली. देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण (National Flag hoisting at Mantralaya) केले. या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यत सत्तेत आल्यापासून हे सरकार जनहितासाठी काम करत आहे.महाराष्ट्र हा संपूर्ण देशात अग्रेसर राज्य राहिले पाहिजे. यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न केले जात आहे. यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देश आणि
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, यंदा मुसळधार पावसाचा राज्यातील 28 जिल्ह्यांना फटका बसला आहे. जवळपास 15 लाख हेक्टर क्षेत्र मुसळधार पावसामुळे बाधित झाले आहे. तर 15 हजार नागरिकांना पावसामुळे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. नागरिकांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे. महापूर अतिवृष्टी आदी गोष्टींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. पावसामुळे, नद्या नाले यांना पूर येऊ नये यासाठी गाळ काढणे, प्रवाह असलेल्या क्षेत्रातील खोली वाढविणे यांसारखे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. (हेही वाचा, Independence Day 2022: ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते ध्वजारोहण, शिंदे गटासह ठाकरे गटाचीही कार्यक्रमास उपस्थिती)
ट्विट
७६वा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम मंत्रालय, मुंबई येथून लाईव्ह https://t.co/yqyISCqhCo
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 15, 2022
दरम्यान, राज्यातील ओबीसी, धनगर समाजास आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारल्याने ओबीसी समाजाला पुन्हा एकदा आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे मोठी गोष्ट घडली आहे. दुर्बल विकासासाठी अमृत संस्थेला उभारी देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.