शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती. या परंपरेनुसार ठाण्यात दरवर्षी 15 ऑगस्टला (August) रात्री 12 वाजता ध्वजारोहण केल्या जातं. ठाण्याची (Thane) तिचं परंपरा कायम ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून (CM Eknath Shinde) मध्यरात्री शिवसेनेच्या शाखेवर ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शेकडो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सोबतच ठाकरे गटातील (Thackeray Group) कार्यकर्त्यांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावली होती. ठाकरे गटातील राजन विचारे (Rajan Vichare) यांना पोलिसांकडून कार्यक्रमास उपस्थित न राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. तरीही राजन विचारे यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा सामना देखील रंगणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सुदैवानं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही. कार्यक्रम स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) म्हणजे देशाचा होता. या कार्यक्रमात दोन्ही गटाने शांतता दर्शवत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम गुण्यागोविंदाने पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केलं आणि देशाच्या अमृत महोत्सवी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरु केलेल्या मध्यरात्री ध्वजारोहणाच्या परंपरेबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.तसेच हर घर तिरंगा मोहिमेत राज्यातील जनतेने दाखवलेल्या उत्सफूर्त प्रतिसादाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे कौतुक केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाणे शहरात सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न#स्वातंत्र्यदिन #IndiaAt75 #AzadiKaAmritMahotsav pic.twitter.com/xnwXLlncwc
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 14, 2022
तसेच, ध्वजारोहणासाठी उद्धव गटात असलेली राजन विचारेही उपस्थित होते. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या. ज्यांना या ध्वजारोहण (Flaghosting) समारंभासाठी उपस्थित राहायचं आहे, त्यांना येऊ द्या, असं सांगितलं होतं. राजन विचारेंची उपस्थिती ही जरा आश्चर्यचकित करणारी घटना होती तरी दोन्ही गट एकाच कार्यक्रमात उपस्थित असताना देखील सुदैवाने शांततेत कार्यक्रम पार पडला.