Wainganga River: भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या (Wainganga River) जलस्तरात (Water Level) मोठी वाढ झाली आहे. वैनगंगा नदीवर असलेला लहान पुलावरून पाणी वाहत असून या ठिकाणी वाहतूक पूर्णता बंद करण्यात आली आहे. तसेच गोसेखुर्द धरणाचे एकूण 33 दरवाजे 2 मीटर ने उघडण्यात आले आहेत.
मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीसह इतर नदी-नाल्यांच्या तीरावरील जिल्ह्यातील तब्बल 130 गावांना पूराचा धोका कायम आहे. वैनगंगेच्या तीरावर 99 गावे असून त्यापैकी 83 गावांना कायम धोका पुराचा धोका असतो. अतिवृष्टीमुळे या गावातील नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. (हेही वाचा - Maharashtra Rains Update: मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणच्या किनारपट्टीवर पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता)
#भंडारा जिल्ह्यात २ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर मध्ये वाढ झाली आहे. वैनगंगा नदीवर असलेला लहान पुलावरून पाणी वाहत असून या ठिकाणी वाहतूक पूर्णता बंद करण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणाचे एकूण ३३ दरवाजे २ मीटर ने उघडण्यात आले आहेत. pic.twitter.com/Z8xBA5IiQq
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 29, 2020
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा, सूर, कन्हान, बावनथडी, चुलबंध या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नद्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यानंतर या नद्यांना पूर येतो. त्यामुळे या भागातील पिकांचे मोठे नुकसान होते. भंडारा जिल्ह्यात 154 गावे नदी तिरावर आहेत.
यातील 130 गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. जिल्ह्यातील गोसे प्रकल्पांमुळे अनेक गावात समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यात प्रकल्पाच्या पाण्यात वाढ झाल्याने अनेक गावांत वैनगंगेचे पाणी शिरते. अद्याप याठिकाणी पुनर्वसनाच्या समस्या कायम आहेत.