File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

इन्कम टॅक्स विभागाकडून (Income Tax Department) 25 जनेवारीला मुंबई (Mumbai) मध्ये केलेल्या जप्तीच्या कारवाईत मुंबई महानगरपालिकेतील (BMC) एक प्रमुख व्यक्ती आणि त्यांचे जवळचे सहकारी आणि काही कंत्राटदार यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहे. मुंबईत 35 पेक्षा अधिक ठिकाणी टाकण्यात आलेल्या छापेमारीत काही कागदपत्र, डिजिटल पुरावे आणि पत्रकं सापडली आहेत.

आयटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहारांमध्ये त्यांच्या सहभागाचे पुरावे आणि बेकायदेशीरपणे कमावलेले पैसे काही परदेशी अधिकार क्षेत्रात पाठवले गेले आहेत. 36 स्थावर मालमत्ता आहेत त्यांचे मुल्य 130 कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे. या कंत्राटदारांनी वरील गैरप्रकारांमुळे 200 कोटी रुपयांचे उत्पन्न चुकवले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. तपासामध्ये 2 कोटी रुपयांची अज्ञात रोख आणि 1.5 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असल्याने आयटी विभागाने सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.

ANI Tweet

कंत्राटदारांच्या बाबतीत, जप्त केलेल्या कागदपत्रांवरून त्यांचा खर्च वाढवून करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात दडपण्यासाठी त्यांनी अवलंबलेली कार्यपद्धती उघड होते. या उद्देशासाठी, प्रमुख उपाय म्हणजे उप-कंत्राट खर्चाचे ओव्हर-इनव्हॉइसिंग संस्थांच्या चक्रव्यूहातून आणि गैर-वास्तविक खर्चाचा दावा करून दाखवल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या घरी आयटी ने सलग 4 दिवस धाड टाकली होती. त्यांनी काही कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉर्पोरेट अफेयर्सने यशवंत जाधव यांच्या 12 पेक्षा अधिक शेल कंपन्या उघडकीस आणल्या आहेत.