कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव महाराष्ट्र (Maharashtra) राज्यावर सर्वाधिक असून महाराष्ट्र पोलिस दलातील कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दिवसागणित कोरोना बाधित पोलिसांची संख्याही वाढत आहे. मागील 24 तासांत 75 पोलिसांना कोविड 19 ची बाधा झाली आहे. 75 कोरोनाग्रस्त पोलिसांची भर पडल्याने महाराष्ट्रातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या 1964 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 20 पोलिसांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 849 पोलिस कोरनामुक्त झाले असून 1095 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. (कोरोनावर मात करुन ड्युटीवर रुजू झालेल्या महाराष्ट्र पोलिसांचा प्रेरणादायी व्हिडिओ नक्की पाहा, जनतेला देतायत मोलाचा संदेश)
दरम्यान पोलिस दलातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांना Arsenicum Album 30 आणि Camphora 1m या औषधांचे डोस देण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसच्या संकट काळात पोलिस जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी सायन हॉस्पिटलमधील 4 बेवारस मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्याचे काम पोलिस नाईक संध्या शीलवंत यांनी केले होते.
ANI Tweet:
In the last 24 hours, 75 police personnel have tested positive for #COVID19 have been reported. Total number of positive cases in Maharashtra Police rise to 1964 with death toll at 20. Total 849 personnel have recovered and 1095 cases are active: Maharashtra Police pic.twitter.com/vRpLNsREH2
— ANI (@ANI) May 27, 2020
Ganeshotsav 2020: भाद्रपदात गणेशोत्सव होणार नाही; कोरोनाच्या Wadala GSB गणेशोत्सव समितीचा निर्णय - Watch Video
कोरोना बाधितांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 54758 वर पोहचला असून त्यापैकी 36004 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. त्यापैकी 16954 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1792 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिस कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. परंतु, लवकरच लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार असून 1 जूननंतर नेमके काय होणार, हे जनतेसमोर स्पष्ट करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जनतेशी बोलताना सांगितले आहे.