MNS New Flag (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) महाराष्ट्रसह (Maharashtra) संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आणि सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना विरोधात लढा देत आहेत. दरम्यान, नागरिकांना सेवा देत असताना सरकारी कर्मचारीही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आग्रेसर भुमिका घेतली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आजारपणाची नव्हेतर, विशेष रजा देण्यात यावी, अशी मागणी मनसेने नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी जीवापाड प्रयत्न करत आहेत. मात्र, या लढ्यात अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आजारपणाची सुट्टी देण्यात येत आहे. यावर मनसेने आग्रेसर भुमिका घेतली असून सरकारी कर्मचाऱ्यांना आजारपणाची नव्हेतर, विशेष रजा देण्यात यावी, अशी मागणीचे पत्र मनसेने नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आक्रमक; मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई किट, माक्स न मिळाल्याने कचऱ्याच्या गाड्या बीएमसीबाहेर उभ्या करून केले आंदोलन

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक दिसू लागली आहे. मुंबई पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पीपीई किट आणि मास्कचा पुरवठा होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने बुधवारी आंदोलन पुकारले होते. कंत्राटी कामगारांना सुरक्षा किट देणे गरजेचे आहे. जर त्यांना काही झाले तर, याची जवाबदारी कोण घेणार? असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी माध्यमातून महापालिकेला विचारला होता. तसेच कंत्राटी कामगारांना तातडीने सुरक्षा किट पुरवल्या जाव्यात, यासाठी कर्मचाऱ्यांनी महापालिकेबाहेर कचऱ्याच्या गाड्या उभ्या करून आंदोलन सुरु केले होते.