महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आक्रमक; मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई किट, माक्स न मिळाल्याने कचऱ्याच्या गाड्या बीएमसीबाहेर उभ्या करून केले आंदोलन
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष (file photo)

कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे जाळे संपूर्ण भारतात पसरत चालले आहे. कोरोनावर विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या (Lockdown) चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान आपल्या आपल्या जीवावर उदार होऊन नागरकांची सेवा करण्यासाठी डॉक्टर, वेद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह सफाई कर्मचारीही मोलाचा वाटा उचलत आहेत. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची (Contract Cleaning Workers) गैरसोय होत असल्याने मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. तसेच कंत्राटी कामगारांना सुरक्षा किट मिळत नसल्याने त्यांनी मुंबई महापालिकेच्या कार्यालयासमोर अंदोलन सुरु केले आहे.

कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची गैरसोय सोय होऊ नये म्हणून अधिक मेहनत घेत आहेत. मात्र, मुंबई पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पीपीई किट आणि मास्कचा पुरवठा होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने आक्रमक भुमिका घेतली आहे. कंत्राटी कामगारांना सुरक्षा किट देणे गरजेचे आहे. जर त्यांना काही झाले तर, याची जवाबदारी कोण घेणार? असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी माध्यमातून महापालिकेला विचारला आहे. तसेच कंत्राटी कामगारांना तातडीने सुरक्षा किट पुरवल्या जाव्यात, यासाठी कर्मचाऱ्यांनी महापालिकेबाहेर कचऱ्याच्या गाड्या उभ्या करून आंदोलन सुरु केले आहे. हे देखील वाचा- सायन, नायर, केईएम यांसह BMC च्या रुग्णालयात COVID-19 च्या गंभीर रुग्णांसाठी Tocilizumab या नव्या औषधाचा वापर सुरु

 

संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे काही नेते आणि तब्बल 600 ते 700 कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अद्याप मुंबई महापालिकेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेतेसाठी मुंबई महापालिका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.