Coronavirus: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात कोरोनाने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात आज 135 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 2020 इतकी झाली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या चार- पाच दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला होता. परंतु, आज जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची संख्या शंभरपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे जळगावाकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव शहरात तसेच चोपड्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय आज नोंद करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण चोपडा आणि जळगाव शहरात आढळून आले आहेत. (हेही वाचा - Ganeshotsav 2020: गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना गणेश मंडळांना मान्य)
जळगाव जिल्ह्यात आज नवीन 135 कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 2020 इतकी झाली.
— ALL INDIA RADIO JALGAON (@AIRJALGAON) June 18, 2020
जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 1057 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये जळगाव शहर-225, जळगाव ग्रामीण-22, भुसावळ-176, अमळनेर-132, चोपडा-80, पाचोरा-28, भडगाव-78, धरणगाव-34, यावल-45, एरंडोल-31, जामनेर-37, रावेर-74, पारोळा-63, चाळीसगाव-16, मुकताईनगर-7, बोदवड-8 रुग्णांचा समावेश आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई शहर, पुणे, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नागपूर जिल्ह्यात आढळून येत आहेत. दरम्यान, बुधवारी राज्यात 3307 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1,16,752 इतकी झाली आहे. याशिवाय 114 जणांचा कोरोना व्हायरमुळे बळी गेला आहे.