माझ्या लोकप्रियतेमुळे हल्ला झाला- रामदास आठवले
रामदास आठवले (Photo Credit : ANI)

अंबरनाथ येथे एका कार्यक्रमादरम्यान एका तरुणाने रामदास आठवले यांना कानशिलात लगावली. या प्रकारानंतर केंद्रीय मंत्री (Union Minister) रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले की, मी लोकप्रिय नेता असल्याने माझ्यावर हल्ला करण्यात आला. कोणीतरी एखाद्या मुद्द्यावर नाराज असेल त्यामुळे माझ्यावर हल्ला करण्यात आला असावा. त्याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्थाही ठेवली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकारबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असून याची चौकशी व्हायला हवी असेही त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या युवकाची धुलाई; समर्थकांची महाराष्ट्र बंदची हाक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या (Republican Party of India) वतीने अंबरनाथ येथील नेताजी मैदानावर 'संविधान गौरव महोत्सव' आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर मंचावरुन खाली उतरताच प्रविण गोसावी या युवकाने आठवलेंच्या कानशीलात लगावली. या प्रकरणानंतर आठवले समर्थकांनी त्याला बेदम चोप दिला. सध्या तो जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. युवकाच्या वर्तनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.