Igatpuri Rave Party: अभिनेत्री हीना पांचाळ हिच्यासह 24 जणांना जामीन,  इगतपूरी रेव्ह पार्टी प्रकरण
Heena Panchal | (Photo Credit - Instagram )

नाशिक जवळील इगतपूरी रेव्ह पार्टी (Igatpuri Rave Party) प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अटक केलेल्या 24 संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून सोमवारी (19 जुलै) जामीन मंजूर करण्यात आला. यात अभिनेत्री बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) फेम हीना पांचाळ (Actress Heena Panchal Granted Bail) हिच्यासह इतर काहींचा समावेश आहे. दरम्यान, हर्ष शलैश शहा आणि 'बर्थ डे बॉय' पीयूष सेठी या दोघांचे जामीन अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळले. या दोघांकडे अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. इगतपुरी येथील रेव्ह पार्टीबाबत माहिती मिळताच पोलिसानी धडक कारवाई गेल्या महिन्यात (27 जून) केली होती. या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन अभिनेत्री हिना पांचाळ (Heena Panchal) हिच्यासह एकूण 22 जणांना ताब्यात घेतले अशी प्राथमिक माहिती होती. यात 10 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश होता. याशिवाय, मुंबईतून नायजेरीन व्यक्ती उमाही पीटर यालाही अटक झाली होती. तसेच, या पार्टीत काही हिंदी आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तसेच काही विदेशी तरुण, तरुणांचाही समावेश होता.

इगतपुरी येथील दोन बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती नाशिक ग्रामिण पोलिसांना मिळाली होती. ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी प्राप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. यावेळी 28 जणांना अटक झाली होती. यातील 25 जणांवर अंमतली पदार्थ विरोधी कायद्यानुसार कारवाई करत गुन्हा दाखल झाला होता. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. नंतर यांची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली. त्यापैकी 24 जणांना जामीन मंजूर झाला. (हेही वाचा, Igatpuri Rave Party: ‘बिग बॉस मराठी’ फेम हीना पांचाळ हिच्यासह 25 जणांना न्यायालयीन कोठडी; इगतपूरी रेव्ह पार्टी प्रकरण)

दरम्यान, पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी काही जणांकडे प्रत्यक्षात पाच ग्रॅम कोकेन आढळून आले. काहींनी त्यांच्याकडील कोकेन स्वमींग पुलाच्या पाण्यात टाकले. पोलिसांना याबाबत माहिती समजली. तेव्हा पोलिसांनी पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेऊन ते न्यायवैद्यकीय चाचणीसाठी पाठवले. या नमुन्यांत कोकेनचा अंश आढळला.