पश्चिम महाराष्ट्रात डान्स बार सुरु केले तर लक्षात ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारला इशारा
मुंबई डान्सबार (संग्रहिचित्र)

मुंबईत पुन्हा एकदा छमछम होण्यासाठी दारे उघडी झाली आहेत. यामुळे रात्री 11.30 वाजेपर्यंत डान्स बार सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात डान्स बार बंदी हटवून पुन्हा सुरु केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाने दिला आहे.

राज्यात डान्स बारवरील अनेक बंधने सर्वोच्च न्यायालयाने हटविली आहे. त्यामुळे मुंबईत डान्स बार सुरु होणार आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सुसंस्कृत आणि सुजाण नागरिकाला आनंद होणार नाही. त्यामुळे डान्स बारचा निर्णय हा जनतेसाठी हितकारक नसल्याचे राष्ट्रवती काँग्रेस साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष सनी मानकर यांनी म्हटले आहे. जर पश्चिम महाराष्ट्रात डान्स बार सुरु होऊ होणार नाही यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.(हेही वाचा- महाराष्ट्रात डान्सबार बंदी कायम राहणार? सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती)

डान्स बारच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनेदेखील सरकारवर निशाणा साधला आहे. डान्स बार बंदीचा निर्णय चांगला होता, पण सरकारचा मसूदा मजबूत नव्हता, आता जो अध्यादेश काढला जाईल तो तरी मजबूत असावा आणि कोर्टात टिकणारा असावा, असा टोला शिवसेनेने भाजपा सरकारला लगावला आहे.