मला दुचाकीची सवय नाही; मात्र, 3 चाकी सरकार चालवतो आहे– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Devendra Fadanvis, Uddhav Thackeray (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकार तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असल्याची टीका केली होती. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मला दुचाकी चालवण्याची सवय नाही, पण सध्या तीन चाकी कार नाही पण सरकार चालवतो आहे असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानात केले आहे. यावर अद्याप विरोधी पक्षातील नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात 11 जानेवारीपासून ते 17 जानेवारीपर्यंत 31वे 110254रस्ता सुरक्षा अभियान 2020 साजरा करण्यात येत आहे. मोटार वाहन अपघातास परिणाकारकरित्या आळा बसावा यासाठी दरवर्षी देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. दरम्यान, या अभियानात सहभागी होऊन उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “आमच्यावर 3 चाकी सरकार असल्याची टीका होत आहे. तीनचाकी तर तीनचाकी…पण आमचे सरकार चालत आहे ना हे महत्त्वाचे आहे. दोन चाक असो किंवा तीन चाक असो समतोल जमला पाहिजे. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. चार चाके असूनही आपटायचे ते आपटले आहेत. तसेच जो चालवणारा असतो त्याच्या हातातील चाक महत्त्वाचे असते. त्या चाकावर गाडी चालत असते. त्या चालवणाऱ्याला सगळे नियम सांगणे महत्त्वाचे आहेत,”असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- भाजप म्हणते 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाशी पक्षाचा संबंध नाही; जय भगवान गोयल म्हणतात 'पक्षाने आदेश दिल्यास पुस्तक मागे घेऊ'

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकार तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असल्याची टीका केली होती. “इतका मोठा विरोधाभास असल्याचे सरकार राज्यात सत्तेत येणार आहे. दोन चाके असणारे वाहन धावते पण तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असणाऱ्या या सरकारची चाके तीन दिशेला धावली तर काय होईल?,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता.