Local Train Accident: मुंबई लोकल (Mumbai Local) ट्रेनला हायड्रा क्रेन (Hydra Crane) धडकल्याने झालेल्या अपघातात (Accident) मोटरमन (Motorman) जखमी झाला आहे. शुक्रवारी (27 जानेवारी) मध्यरात्री हा अपघात घडला. प्राप्त माहितीनुसार, मोटरमनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकात फलाट क्रमांक एक वर ही घटना घडली. रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून गुन्हाही दाखल केला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन आणि पोलीस घटनेचा अधिक तपास तपास करत आहेत. लोकल ट्रेन आणि क्रेन यांच्यात धडक होऊन घडलेल्या अपघाताही ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना मानले जात आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणाला ताब्यात घेतल्याचे वृत्त नाही.
पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकात फलाट क्रमांक एकवर लिफ्टचे काम मध्यरात्रीच्या वेळी करण्यात येणार होते. त्यासाठी स्टीलचे खांब उभारण्याचे काम वेगाने सुरु होते. त्यासाठी बॉकचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, या कामासाठी आणलेली क्रेन रुळापासून अवघ्या काही अंतरावर उभी होती. ब्लॉक आणण्याचे काम सुरुच होते. इथक्यात रुळाशेजारी उभ्या असलेल्या एका तृथीयपंथीयाने क्रेनवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत एक दगड क्रेन चालकाच्या हाताला लागला आणि त्याला दुखापत झाली. त्यामुळे आलेल्या वेदनेमुळे त्याला क्रेन नियंत्रीत करण्यात आली नाही. क्रेन सरळ जाऊन लोकल ट्रेनवर आदळली. (हेही वाचा - Mumbai Local : मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला वकिलाचा विनयभंग, आरोपीविरोधात गुन्हा दाखल)
क्रेनचे लोखंडी हूक मुंबई लोकल ट्रेनच्या काचेवर आदळले. जिथे मोटरमन बसतो. प्राप्त माहितीनुसार, मध्यरात्री साधारण 00.55 वाजता एक उपनगरीय विरार लोकल डाऊनच्या दिशेने नायगाव स्थानकात प्रवेश करत होती. दरम्यान, क्रेनचे हुक ट्रेनच्या काचेवर आदळले. काच फुटली आणि मोटरमनच्या डोक्याला दुखापत झाली. या घटनेत ट्रेनचा वेग मंद होता. त्यामुळे मोटरमनला केवळ किरकोळ दुखापत झाली. नेहमीच्या वेगाने ट्रेन जर वेगात असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
Maharashtra | Local motorman injured after boom of Hydra crane working near Naigaon’s Western line hit EMU motor cabin damaging the windshield. Primary aide provided to motorman who sustained minor injuries. The crane operator was distracted by passenger activity during incident. pic.twitter.com/k0OoNHs2Dt
— ANI (@ANI) January 28, 2023
दरम्यान, जखमी मोटरमनला प्राथमिक उपचार करण्यात आले. ज्यानंतर त्याला स्वस्थ वाटू लागले, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा तृथीयपंथीयांचा मुद्दा पुढे आला आहे. नायगाव स्टेशन परिसरात तृतीयपंथीयांकडून बेकायदेशीर कृत्य आणि वर्तन केले जात असते. त्यामुळे रेल्वेचे काम झाले तर परिसरात त्यांना हे कृत्य करता येणार नाही यातून ही दगडफेक झाली की त्याला आणखी इतर काही कारणे आहेत? याबाबत पोलीस तपास करत आहेत.